Wednesday, February 24, 2016

विद्रोह

काय असतो विद्रोह नक्की?
नक्की कुठे वेगळी करायची आपली जीवनशैली आणि जीवनावश्यकता?
म्हणजे व्यापार तर चांगलीच गोष्ट आहे.
पण bank balence बरोबर माणुसकी पण वाढवा की.
पैसा कमावून व्हा की मोठे, सर्वार्थानी.
सगळ्यात वाईट गोष्ट आहे की सर्व योग्य प्रश्न आणि त्यांची जायज़ उत्तरं पण माहित आहेत.
पण बदल जरी अविरत असला तरी मला बदल  अविरत पुढे ढकलण्याची कला पण खूप चांगली येते.
जरा मोठं होऊया, हेच तर वय आहे. एक ओहदा मिळू द्या मग दाखवतो.
मरूनच का नाही जात मग?
सगळ्या यशापयाशांची शेवटची पायरी. का त्यानंतर पण अडकायचं मुक्तीच्या फेऱ्यात?
कशातच अर्थ नाही. जमिनीत आहे, दोन्ही अर्थांचा अर्थ.
पण त्यात पण रुजलेयेत वाद, अस्मिता, तफावती, जाती, द्वेष. जमीन पण ना सगळ्याच गोष्टींसाठी उपजाऊ बनून जाते साली.
स्थिर, गंभीर, काळी.
खूप वेळ निखरत बसलं न तिच्याकडे तर दिसतात बऱ्याच नकोश्या गोष्टी.
त्यापेक्षा जमिनींवर अंथरू काँक्रीटच्या चादरी, आणि आकाशात जाऊ राहायला. हे बरंय.
पण मग अंधार झाला की दिसणं बंद होतं आणि जाणवणं सुरु होतं.
दारू पण बंद नाही करू शकत उघडलेले receptors
मग परत चालू होतात तेच सात्विक वाद स्वतःशी
पण हे सात्विक वाद कधी होणार राग, संताप?
रात्रीच्या अंधारातून दिवसाच्या उजेडात येणार का हा राग?
का सकाळी उठून परत जीवनशैली जपण्याचा संघर्ष चालू करणार?
काय असतो विद्रोह नक्की?
जीवनाची आवश्यकता कधी जाणवणार?
मग जीवन अर्थपूर्ण बनवायला मी प्रेम, वासना, मैत्री, देशप्रेम, करुणा वगैरे बेगडी गोष्टी भरून घेतो आणि आदर्श नागरिक बनवतो स्वतःला, मजा येते.
वेळ तर निघून जाते, दिवस तर ढळून जातो. मग काय तर?
पण आता तेवढ्याशानी काही होत नाही
आता बाजू घ्यायला लागतात आणि त्यांचा समर्थन पण करायला लागतं compulsory
ते हि चालेल, पण काय आहे कि बाजू तुम्ही नाही इतर ठरवतील, समर्थन मात्र मलाच करायला लागणार.
बरं दुसऱ्यानी ठरवलेल्या बाजूंमधून आपल्याला सोयीस्कर बाजू पण स्वीकारायला हरकत नाही.
पण कसं आहे की तुमच्या identity वरून तुमची बाजू काय असणार ह्याचा पण algorithm तयार आहे, काय समजलात काय आमच्या समाजाला?
चेहरा नसला तरी काय झालं seperatist logic खूप गहिरं आणि प्राचीन आहे, जात नाही.
"पथ्थर मारो!" आज समाजातून आवाज आला. "कोणावर?" मी विचारलं. "public property पर, कैसी है यह public. सबको line में खडा करना चाहिये."
Okay. सतत, सतत स्वतःला इतरांपेक्षा वेगळं करायचं अनामिक राहून. पण आज मी बघूनच घेतली समाजाची ज़ुबान. काळी आहे, जमिनीसारखीच.
पण तरीही तीच्याशी चर्चा नाही करता आली, पण तिला हिंसा करवता येते. पथ्थर उचललेले लोकांनी, त्यांचेही कान फक्त हातांशी जोडलेले असतात, डोक्याशी नाही.
तेव्हा समजलं सगळ्यात कठीण आणि खतरनाक आहे डोकं वापरणं. प्रश्न विचारणं.
हाच असतो का विद्रोह?