मी नव्हतो आधी कोणी पण
मला व्हायच नव्हत कोणी ही
पण मला ओळख मिळालीच नाही.
ह्या सगळ्या अनोळखी जगात
माझा चेहरा पुसालच जात नाही
आणि मग तू, मी आणि आम्ही
पण मी खरच त्यातला नाही.
झेंडे, फुले आणि शस्त्र
मी होऊच शकत नाही विवस्त्र
तू कोण, कोठून, कोणाचा
पहिल नाव, शेवटचा नाव संगितल्याशिवाय सुटकच नाय
No comments:
Post a Comment